मुंबई : वांद्रे येथील झोपडपट्टीत आगीचा तांडव, 50 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक

Foto

सांजवार्ता ऑनलाईन

मुंबई – वांद्रे पश्चिम येथील नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीला मंगळवारी सकाळी आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही, मात्र या आगीत 50 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या तत्काळ रवाना झाल्या. दुपारी एक पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

 

वांद्रे पश्चिम येथील नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीला आग लागल्याची माहिती मिळाल्या बरोबर अग्निशमन पथक रवाना झाले. त्यांचे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु  आहेत. झोपडपट्टीतील चिंचोळ्या गल्यांमुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत. एकमेकांना खेटून उभा असलेल्या झोपड्यांमुळे आग वेगाने पसरत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आगीत 50 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या आहेत, यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

मागील वर्षीही वांद्रे येथील झोपडपट्टीला आग

मागील वर्षी वांद्रे येथील गरीबनगर झोपडपट्टीला आग लागली होती. दाट लोकवस्तीच्या या झोपडपट्टीला लागलेल्या आगीत मोठी वित्तहानी झाली होती, तर अनेक संसार उघड्यावर आले होते.